गुजरात विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या प्रयत्नात असलेली भारतीय जनता पार्टी आता गुजरात प्राईडचा नवा डाव खेळण्याच्या तयारीत आहे, आणि ह्यासाठी त्यांनी एक खास पंचलाईन बनवली आहे. ह्यानुसार पार्टीची योजना आहे कि गावात मोदींच्या फोटोसोबत होर्डींग्स लावायच्या आणि ज्यावर गुजराथीत लिहलेले असेल कि हे मोदींचे गाव आहे आणि विरोधकांना येथे प्रवेश वर्जित आहे. पार्टी च्या लोकांना असे वाटत आहे कि ह्यामुळे ते हार्दिक पटेल आणि कॉंग्रेस च्या नेत्यांवर मात करू शकतील.
सध्या असे होर्डिंग पार्टी हजारोंच्या संखेने छापत आहे. आणि काही ठिकाणी तर ह्या प्रकारच्या होर्डींग्स लावायला सुरवात सुद्धा करण्यात आली आहे. पार्टीच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार ह्या होर्डिंग मुळे असा संदेश जाईल कि गावातल्या लोकांनीच विरोधकांना गावात वोट मागण्यासाठी येण्यास विरोध केला आहे. आता हेच बघायचे आहे कि ह्या होर्डींग्स चा भाजपा ला किती फायदा होतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews